शेन वॉर्नला ‘सेहवाग स्टाईल’ वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

फिरकी जादूगार आणि संपूर्ण जगभरतील फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवणाऱ्या शेन वॉर्नने आज वयाचे ४८ वर्ष पूर्ण केले आहेत. जगभरातुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ट्विटरचा बादशहा आणि शेन वॉर्नचा भारतातील जिवलग मित्र म्हणजेच वीरेंद्र सेहवागनेही ट्विटरवर त्याचा आणि शेनचा फोटो शेयर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याने शेनचा हाताला प्लास्टर असलेला त्याच्या दुखापतीच्या काळातील फोटो शेयर करत खाली कॅपशन लिहले आहे की, ” प्रत्येक फलंदाजला असे वाटायचे की तुझ्या हाताला सदैव असेच प्लास्टर असावे”.

ट्विटरवर सेहवाग किती सक्रिय असतो हे आपल्या सर्वाना माहित आहे आणि त्याने या आधी ही असे बऱ्याच वेळा केले आहे.

पाहुयात काय आहे ते ट्विट !