एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची घोषणा

दिल्ली | १८व्या एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष संघाची आज घोषणा करण्यात आली.

१२ खेळाडूंच्या पुरुषांच्या संघात गिरीश इरनाक आणि रिशांक देवाडिगा या महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना तर १२ खेळाडूंच्या महिलांच्या संघात सायली केरीपाळे या महाराष्ट्राच्या एकमेव खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

पुरुषांचा संघ- गिरीष इरनक, दिपक हुडा, मोहित चिल्लर, संदीप नरवाल, परदिप नरवाल, रिशांक देवडिगा, मोनु गोयत, अजय ठाकूर, रोहित कुमार, राजूलाल चौधरी, मल्लेश गंधारी, राजू चौधरी. स्टॅड बाय- अमीत नागर, मनिंदर सिंग

महिलांचा संघ- साक्षी कुमारी, कविता, प्रियांका, मनप्रीत कौर, पायल चौधरी, रितू नेगी, सोनाली शिंगटे, सायली केरीपाळे, रनदिप कौर खेरा, शालिनी पाठक, उषा नरसिंग, मधू. स्टॅड बाय-  प्रियांका, शमा परविन

महत्त्वाच्या बातम्या:

-Blog: हॅप्पी बर्थडे धोनी- रांची का छोकरा ते कॅप्टन कूल माही

-दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा पराभव, इंग्लंडने केली १-१ बरोबरी