अफगाणिस्तानविरुद्ध वन-डेतील कॅप्टन्सी धोनीला पडली महागात

भारतीय संघाने एशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शिखर धवनला विश्रांती दिली होती. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधारपदाची धुरा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संभाळली होता.

”संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर एमेकेएस प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने नाराजी व्यक्त केली आहे.” असे बीसीसीआयच्या मधील वरिष्ठ सुत्रांनी सांगितले.

या सामन्यासाठी भारतीय संघात तब्बल पाच बदल केले होते. त्यामध्ये केएल राहुल, मनीष पांडे, सिद्धार्थ कौल, दीपक चहर आणि खलील अहमद यांना संघात स्थान दिले होते. विश्रांती देण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रित बुमरा, भुवनेश्वर कुमार व युजेंद्र चहल यांचा समावेश होता.

धोनीचा हा कर्णधार म्हणून खेळतानाचा 200 वा वन-डे सामना होता.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, कसोटीतील उपकर्णधार अजिंक्य रहाणे, वन-डेतील उपकर्णधार रोहित शर्मा, निवड समितीचे मुख्य सदस्य एमकेएस प्रसाद तसेच सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे सदस्य यांच्यात एक बैठक आज (10 आॅक्टोबरला) होणार आहे.

या बैठकीत भारतीय संघाचा दक्षिण अफ्रिका दौरा, इंग्लड दौरा तसेच एशिया कप स्पर्धांचे मुल्यमापन करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-