न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

मँचेस्टर। आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात आज(9 जूलै) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताने 11 जणांच्या संघात एक बदल केला आहे. भारताने या सामन्यात कुलदीप यादव ऐवजी युजवेंद्र चहलला आज संधी दिली आहे. तसेच न्यूझीलंडने टीम साऊथी ऐवजी लॉकी फर्ग्यूसनला संधी दिली आहे.

या विश्वचषकातील साखळी फेरीचा भारत आणि न्यूझीलंड संघामधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या विश्वचषकात पहिल्यांदाच हे दोन संघ आमने सामने येत आहेत.

या सामन्यात विजयी होणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचा या विश्वचषकातील प्रवास संपणार आहे.

असे आहेत 11 जणांचे संघ –

भारत – केएल राहुल, रोहित शर्मा, वराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हर्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), जेम्स निशाम, कॉलिन डी ग्रँडहोम, मिशेल सँटनर, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: कोहली म्हणतो, सामन्याआधी विलियम्सनला या गोष्टीची करुन देणार आठवण!

काय आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्यांचा इतिहास?

टीम इंडियाने असा साजरा केला एमएस धोनीचा वाढदिवस, पहा व्हि़डिओ