भातसई राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत असे होणार उपांत्य फेरीचे सामने.

गांवदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसई यांचा मंडळाचा सुवर्ण महोस्तवी वर्ष असून कै. शांताराम मा. कोतवाल क्रीडा नगरीत सुरू असलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले. भारत पेट्रोलियम, सेंट्रल बँक, जेएसडब्लू, एयर इंडिया, संघानी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

भारत पेट्रोलियम विरुद्ध रायगड पोलीस यांच्यात पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. भारत पेट्रोलियम संघाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत आघाडी मिळवली. पण रायगड पोलिसांनी चांगला खेळ करत आघाडी कमी केली. मध्यंतरा पर्यत १५-१४ अशी शुल्लक आघाडी भारत पेट्रोलियम कडे होती. अजिंक्य पवार, काशीलिंग आडके व निलेश शिंदे यांनी चांगला खेळ करत विजयात मोलाची भूमिका निभावली. भारत पेट्रोलियम संघाने ३६-२७ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध सेंट्रल बँक यांच्यात अंत्यत चुरशीची लढत झाली. मध्यंतरापर्यत संघाने अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर दोन्ही संघांनी तिसऱ्या चढाईवर खेळ केला. शेवटच्या चढाई आधी २९-२९ असा बरोबरीत सामना होता. शेवटच्या निर्णायक तिसऱ्या चढाईत अजिंक्य पवारची सुपर कॅच झाली. आणि सेन्ट्रल बँकने ३१-२९ असा विजय मिळवला.

एयर इंडिया विरुद्ध सेंट्रल रेल्वे यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात एयर इंडियाने ३०-२० असा सहज विजय मिळवला. मुंबई बंदर विरुद्ध जेएसडब्लू यांच्यात अटीतटीची लढत झाली. जेएसडब्लू संघाने शेवटच्या क्षणी हा सामना २५-२३ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

असे होणार उपांत्य फेरीचे सामने

१) भारत पेट्रोलियम विरुद्ध जेएसडब्लू रायगड

२) एयर इंडिया विरुद्ध सेंट्रल बँक