पुणे-मुंबईचा राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश

कोल्हापूर,यजमान परभणी, पुणे, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सांगली, पालघर, जळगाव, बीड, रायगड, मुंबई शहर आणि ठाणे यांनी परभणी जिल्हा कबड्डी असो. व ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “४५व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्याच्या” कुमार गटात बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.

कुमारी गटात अजून चित्र स्पष्ट नाही. तरी पण सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर यांनी दोन- दोन सामने जिंकत आपली दावेदरी पक्की केली. पुण्याच्या गटात तीन संघ असल्यामुळे एक सामना जिंकत ते देखील अग्रेसर आहेत.

शेलू-परभणी येथील कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी क्रीडानगरीत सुरू असलेल्या मुलांच्या ब गटात पुण्याने प्रथम सिंधुदुर्गला ४७-२० असे, तर नंतर झालेल्या सामन्यात गत उपविजेत्या रत्नागिरीचा प्रतिकार ४४-२५ असा सहज मोडीत बाद फेरी गाठली. ऋषिकेश भोसले, प्रतीक चव्हाण या विजयाचे शिल्पकार ठरले. रत्नागिरीच्या तुषार अधवडे, पवन कराडे यांना आज सूर सापडला नाही. पण याच गटात रत्नागिरीने साताऱ्याला ५०-३१असे नमवित आपला देखील बाद फेरीतील प्रवेश निश्र्चित केला. फ गटात मुंबईने नांदेडचा ६०-१९असा, तर क गटात उपनगरने सांगलीला २६-२४ असे चकवित बाद फेरी गाठली.

ड गटात पालघरने जळगावला४३-३८असे पराभूत करीत या गटात अव्वल स्थान पटकावले, तर जळगाव दुसऱ्या स्थानी राहिला. इ गटात रायगडाने अहमदनगरला ४४-३७ असे नमवित दुसऱ्या विजयाची नोंद केली. सूरज पाटील, नारायण मोरे, राऊल मुनावर या विजयाचे शिल्पकार ठरले. नगरकडून वैभव शिंदे, अजित पवार यांनी कडवी लढत दिली. या गटात गटविजेत्यापदाकरिता रायगड विरुद्ध बीड अशी लढत होईल.अ गटात यजमान परभणीने नाशिकला ४४-३७ असे नमवित बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले. बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना हा विजय महत्वाचा होता. कारण साखळीत त्यांनी एक सामना गमावला होता. ज्ञानेश्वर देशमुख, अमोल राठोड यांना या विजयाचे श्रेय जाते.

मुलींच्या क गटात रत्नागिरीने ठाण्याला ३०-२१ असे नमवित साखळीत दुसऱ्या विजयाची नोंद केली. तसमीन बुरोंडकर, सोनाली भुजंग, गौरी पवार यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय द्यावे लागेल. ठाण्याची प्रमिला सावंत एकाकी लढली. याच गटात बीडने हिंगोलीला ४७-१६असे नमवित पहिला विजय नोंदविला. बीडच्या या विजयाचे श्रेय उर्मिला लांडे हिच्या चतुरस्त्र खेळाला जाते.

फ गटात मुंबई उपनगरने सिंधुदुर्गचा ४४-११असा धुव्वा उडवीत दुसऱ्या विजयासह बाद फेरीतील आपला दावा पक्का केला.इ गटात अत्यंत चुरशीनें खेळला गेलेल्या सामन्यात मुंबई शहराने अहमदनगरचा कडवा प्रतिकार २९-२७असा मोडून काढत बाद फेरीत पोहचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. प्रतीक्षा तांडेल, ऋणाली भुवड, दिव्या यादव यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. नगरच्या सविता शिंदे, स्नेहल खंडागळे, जया राऊत यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा शर्थीचा खेळ केला, पण ते त्यात अपयशी ठरले.

ड गटात कोल्हापुरने सांगलीला ५०-२९असे पराभूत करीत दुसऱ्या विजयासह या गटात अव्वल स्थान मिळविण्याच्या दृष्टीने आगेकूच केली. अ गटात सोलापूरने पालघरला ३६-३०असे नमविलें खरे, पण बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना पुणे- पालघर या सामन्यावर लक्ष ठेवावे लागेल. कारण पुण्याकडून ते १९-३५असे पराभूत झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले!

अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास

अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम