पिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर

मुंबई । एकता परीवार आणि सुपर स्मॅशर्स यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवत डीसीबी बँक पुरस्कृत एकता वर्ल्ड पिकलबॉल सुपर कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

खार जिमखाना येथे रविवारी पार पडलेल्या या सामन्यात एकता यांनी गटवार सामन्यात 47 गुणांची कमाई केली. यानंतर त्यांनी डिंक किलर्सला 8-4 अशा फरकाने पहिल्या उपांत्यसामन्यात विजय मिळवला.तर, दुस-या उपांत्यसामन्यात स्मॅशर्सने मिक्स्ड पिकल्सवर 8-4 अशा फरकाने विजय नोंदवला.

एकता व डिंक पहिल्या सामन्यानंतर सामना 3-3 असा बरोबरीत होता. यानंतर तेजस महाजन कृष्णा मंत्रीला 2-1 अशा फरकाने नमवित संघाला 5-4 अशी आघाडी मिळवून दिली. मनिष राव व सौमित्र कोरगावकर यांनी एकतासाठी अभिजित मडभवी व विशाल चुग जोडीला 3-0 (11-7, 11-7, 11-8) असे नमविले.

अन्य एका उपांत्यफेरीच्या सामन्यात स्मॅशर्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही त्यांना दुहेरीत भुषण पोतनिस आणि कुलदीप महाजन जोडीला आशुतोष मडभवी व अजय चौधरीकडून 1-2 (8-11, 11-7, 10-11) असे पराभूत व्हावे लागले.पण, महिला नॅशनल चॅम्पियन वृशाली ठाकरेने अंकुर कपाडियासोबत खेळताना मिश्र दुहेरीत अजय चौधरी व अर्पणा चौधरी जोडीला 3-0 असे नमविले.

यानंतर स्मॅशर्स संघाने आपला विजयी फॉर्म कायम ठेवत एकेरी व दुहेरी सामन्यांमध्ये चमक दाखवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. मिक्स्ड पिकल्स संघाने तिस-या स्थानासाठी झालेल्या सामन्यात डिंक किलर्स संघावर 8-3 असा विजय मिळवला.

-उपांत्यफेरी निकाल :
– एकता परिवार वि.वि. डिंक किलर्स 8-4
– पुरुष/ मुले दुहेरी : मनिष राव/ अनिकेत दुर्गावली वि.वि. अभिजित मडभवी/कृष्णा मंत्री 2-1 (11-8, 7-11, 11-7)
– मिश्र दुहेरी : सौमित्र कोरगावकर/ सलोनी देवडा वि.वि. विशाल चुग/पूजा वाघ 1-2 (6-11, 11-9, 8-11)
-पुरुष एकेरी : तेजस महाजन वि.वि. कृष्णा मंत्री 2-1 (8-11, 11-10, 11-9)
-पुरुष/ मुले दुहेरी : मनिष राव/ सौमित्र कोरगावकर वि.वि. अभिजित मडभवी/ विशाल चुग 3-0 (11-7, 11-7, 11-8)

– सुपर स्मॅशर्स वि.वि. मिक्स्ड पिकल्स 8-4
– पुरुष/ मुले दुहेरी : भुषण पोतनिस/ कुलदीप महाजन पराभूत वि. आशुतोष मडभवी/ अजय चाउधरी 1-2 (8-11, 11-7, 10-11)
– मिश्र दुहेरी : अंकुर कपाडिया/ वृशाली ठाकरे वि.वि. अजय चौधरी/ अर्पणा चौधरी 3-0 (11-10, 11-8, 11-4)
– पुरुष एकेरी : कुलदीप महाजन वि.वि.प्रशांत मोरे 2-1(11-7, 9-11, 11-7)
– – पुरुष/ मुले दुहेरी : भुषण पोतनिस/ अंकुर कपाडिया वि.वि.आशुतोष मडभवी/प्रशांत मोरे 2-1 (11-8, 8-11, 11-7)

गुणतालिका :
– एकता परिवार 47 गुण 2) मिक्स्ड पिकल्स 45 गुण 3) सुपर स्मॅशर्स 42 गुण 4) डिंक किलर्स 39 गुण 5) फँटम स्टार्स 29 गुण 6) पिकलोहोलिक्स 23 गुण

महत्त्वाच्या बातम्या:

कबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी

टी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच

पुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!