या ४ संघांनी केला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश

हैद्राबाद । येथे सुरु असलेली ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस आहे. आज पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि सेनादल यांनी विजय मिळवत उपांत्यफेरीत प्रवेश केला.

कर्नाटकने परदीप नरवाल नेतृत्व करत असलेल्या तगड्या उत्तराखंड संघाचा ५१-३१ असा मोठा पराभव केला तर महाराष्ट्र संघाने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखाली राहुल चौधरीच्या उत्तर प्रदेश संघाला घरचा रस्ता दाखवला.

प्रो कबड्डीमधील स्टारचा भरणा असलेल्या राजस्थान विरुद्ध हरियाणा सामन्यात हरियाणाने चांगली कामगिरी करत ३१-२९ अशी बाजी मारली. तर उपांत्यपूर्व फेरीच्या शेवटच्या सामन्यात सेनादलने रेल्वे संघाचा ५१-४० असा पराभव केला.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीचा निकाल

सामना १: कर्नाटक विजयी विरुद्ध उत्तराखंड ५१-३१
सामना २: महाराष्ट्र विजयी विरुद्ध उत्तर प्रदेश ४४-३६
सामना ३: हरियाणा विजयी विरुद्ध राजस्थान ३१-२९
सामना ४: सेनादल विजयी विरुद्ध रेल्वे ५१-४०