या चॅनेलवर दाखवले जाणार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे बाद फेरीचे सामने

हैद्राबाद । प्रो कबड्डी आणि एशियन कबड्डी चॅम्पियनशिपनंतर चाहते ज्या स्पर्धेची वाट पाहत होते त्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशीपचे सामने स्टार स्पोर्ट्सवर दाखवण्यात येणार आहे.

यातील ४ आणि ५ जानेवारी रोजी होणारे सामने स्टार स्पोर्ट्स फर्स्ट आणि हॉटस्टारवर दाखवण्यात येणार आहे. ४ जानेवारी रोजी ५ वाजून ४५ मिनिटांनी आणि ५ जानेवारी रोजी ५ वाजून ४५ मिनिट ते १० वाजून १५ मिनिटांपर्यंत हे सामने दाखवले जाणार आहे.

४ जानेवारी रोजी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे तर ५ जानेवारी रोजी उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने दाखवले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जी कबड्डीप्रेमींकडून विचारणा होत होती तिला अखेर पूर्णविराम मिळाला.

कबड्डीचे चाहते हे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र, हरियाणा आणि अन्य राज्यात आहे. प्रो कबड्डीमुळे या खेळाकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याचमुळे चाहत्यांकडून अगदी क्रिकेटप्रमाणे हे सामने टीव्ही माध्यमांवर दाखवण्यासाठी विचारणा होते. यात अगदी क्रिकेटमधील रणजी सामन्यांसाठी जेवढे चाहते आतुर नसतात तेवढे ते कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धां पाहण्यासाठी आतुर असतात.

त्यामुळे ह्या खेळाच्या स्पर्धा स्टार स्पोर्ट्ससारख्या मोठ्या चॅनेलवर दाखवणे आणि ते घरबसल्या पाहणे ही कबड्डीप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.