या कारणामुळे रोहित कुमारची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमधून माघार

डुबकी किंग परदीप नरवालच्या उत्तराखंडकडून खेळण्याच्या निर्णयाबरोबरच सेनादलला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सेनादलचा स्टार रेडर आणि बेंगलुरु बुल्सचा कर्णधार ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये सेनादलकडून खेळताना दिसणार नाही.

हा खेळाडू यावर्षी होणाऱ्या बहुतेक स्पर्धा खेळताना दिसणार नाही.

स्पोर्टसकिडाशी बोलताना सेनादलाच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या स्पर्धेसाठी रोहितला सुट्ट्या हव्या होत्या परंतु त्याने त्या आधीच वापरल्यामुळे हा अडथळा निर्माण झाला आहे.

रोहित भारतीय नौदलात नोकरी करत असून यापूर्वी तो सेनादलकडून अनेक स्पर्धात खेळताना दिसला. रोहित कुमार हा हरियाणा राज्यातील आहे.

रोहितने प्रो कबड्डीबरोबर भारताकडून खेळतानाही जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची कमी सेनादलला या स्पर्धेत नक्कीच जाणवेल.