सेरेना विलियम्सला कन्यारत्न !

आघाडीची टेनिसपटू सेरेना विलियम्स आणि उद्योजग अलेक्सिस ओहानीअन यांना काल कन्यारत्न झाले. फ्लोरिडा येथील ख्रिस शेफर्ड एका पत्रकाराने याची सर्वप्रथम ट्विटरद्वारे माहिती दिली.

३५ वर्षीय सेरेनाने ती गरोदर असल्याची बातमी एप्रिल महिन्यात दिली होती. विलियम्स आणि उद्योजक अलेक्सिस ओहानीअन यांचा डिसेंबर २०१६मध्ये साखरपुडा झाला होता.

इएसपीएन वाहिनीशी बोलताना सेरेनाची मोठी बहीण व्हीनसने या वृत्ताला दुजोरा दिला. ती म्हणाली, ” मी खूप आनंदी आहे. सेरेना तिच्या मुलीसाठी स्वतःच एक मोठा आदर्श आहे. ”

सेरेना विल्यम्सचा प्रशिक्षक असणाऱ्या पॅट्रिक मोराटाग्लूने सेरेनाला ट्विटरवरून शुभेच्छा देताना लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्याला ३ मुली असल्याने आपण ही भावना समजू शकत असल्याचंही तो पुढे म्हणाला.