राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपदासाठी महाराष्ट्राची लढत सेनादलशी

हैद्राबाद । राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महारष्ट्रापाठोपाठ अपेक्षेप्रमाणे सेनादलने अंतिम फेरीत प्रवेश केला. सेनादलने भारताचा माजी कर्णधार असलेल्या अनुप कुमारच्या हरियाणा संघाला ३२-२८ असे पराभूत केले.

पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा १ गुणांच्या फरकाने पराभव केला होता.

सेनादलच्या संघाला पहिल्यापासूनच स्पर्धेतील संभाव्य विजेते म्हणून पहिले जात होते आणि त्यांनी अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या रिशांक देवाडिगाचा संघ अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे.

या सामन्यात महाराष्ट्राकडून रिशांक देवाडिगा, नितीन मदने, निलेश साळुंखे, विकास काळे, गिरीश इर्नाक, ऋतुराज कोरवी आणि विराज लांडगे या खेळाडूंना संधी मिळू शकते.

हा सामना आज रात्री ९ वाजता सुरु होणार आहे.