सेनादल विरुद्ध कर्नाटक असा होणार फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना

मुंबई । अनुप कुमारच्या हरियाणा संघाला पराभूत करत दुसऱ्या उपांत्य फेरीतून सेनादलचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. त्यांचा सामना आता महाराष्ट्राला पराभूत करून पहिल्या उपांत्यफेरीतून अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या बलाढ्य कर्नाटक संघासोबत होणार आहे.

सेनादलने हरियाणाचा एकतर्फी झालेल्या सामन्यात ३८-३१ असा पराभव केला. या संपूर्ण सामन्यात हरियाणाच्या मुख्य रेडरची चांगलीच पकड झाली. अनुप कुमार, मंजीत चिल्लर, संदीप नरवाल हे खेळाडू बराच वेळ बाहेरच होते. अनुपचे यश हे हरियाणासाठी हरियाणासाठी पराभवाकडे नेणारे होते. त्याच्या या सामन्यात सेनादलकडून चांगल्या पकडी झाल्या.

सेनादलकडून या सामन्यात सुरजीतने ३मध्ये १ गुण घेताना ६ यशस्वी पकडी केल्या तर नितीन तोमरने २२ रेडमध्ये ६ गुण घेतले. त्यात तो ३ वेळा बादही झाला. मोनू गोयतने १८ रेडमध्ये ६ गुण घेतले परंतु त्याची ३ वेळा पकड झाली.

हरियाणाकडून अनुप कुमारने १३ रेडमध्ये एकूण ३ गुण घेताना १ बोनस घेतला परंतु त्याची तब्बल ५वेळा पकड झाली.

या सामन्यात सेनादल २४-१३ असे आघाडीवर होते परंतु ही आघाडी हरियाणाने उत्तरार्धात बरीच कमी केली. उत्तरार्धात सेनादलला १४ तर हरियाणाला १८ गुण मिळाले. परंतु पूर्वार्धात सेनादलने केलेला खेळ त्यांना ३८-३१ असा अंतिम फेरीत घेऊन गेला.