पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज टेनिस २०१९ स्पर्धेत जश शहा, देवराज मंदाडे, अर्जुन किर्तने, अमन शहा, अर्जुन परदेशी यांचे विजय

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटातजश शहा, देवराज मंदाडे, अर्जुन किर्तने, अमन शहा, अर्जुन परदेशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ लॉन टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित जश शहाने हर्षवर्धन सिंगचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. देवराज मंदाडे याने अवनीश गवळीचा 6-2 असा सहज पराभव केला. अर्जुन परदेशीने राज दर्डाला 6-2 असे पराभूत केले. नवव्या मानांकित अमन शहाने रोहन बोर्डेवर 6-0 असा विजय मिळवला.

14 वर्षाखालील मुलींच्या गटात पहिल्या फेरीत सानिका लुकतुके हिने वैष्णवी सिंगचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. आदिती हरिपने आरुशी प्रकाशचा टायब्रेकमध्ये 6-5(1) असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

14 वर्षाखालील मुली:पहिली फेरी:
सानिका लुकतुके वि.वि.वैष्णवी सिंग 6-4;
आदिती हरिप वि.वि.आरुशी प्रकाश 6-5(1);
यशिका बक्षी(8)वि.वि.कश्वी राज 6-2;
अलिशा कोसंबी वि.वि.डेलिशा रामघट्टा 6-3;
सिमरन छेत्री(7) वि.वि.श्रीया रुगे 6-2;
समृद्धी भोसले(5)वि.वि.अनन्या देशमुख 6-0;
निशिता देसाई वि.वि.कनिका बाबर 6-4;
रिया अरोरा वि.वि.ख़ुशी पाटील 6-1;
श्रावणी देशमुख वि.वि.रितिका मोरे 6-1;

12वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:
जश शहा(1) वि.वि.हर्षवर्धन सिंग 6-0;
देवराज मंदाडे वि.वि.अवनीश गवळी 6-2;
अर्जुन परदेशी वि.वि.राज दर्डा 6-2;
अमन शहा(9)वि.वि.रोहन बोर्डे 6-0;
रेयांश बेहेले वि.वि.अर्जुन खलाटे 6-3;
अर्जुन किर्तने(3)वि.वि.अर्पित साळुंखे 6-0;
अंकित रॉय वि.वि.हिमनिश बागिया 6-3;
आरुष मिश्रा(7)वि.वि.अभिषेक खंडाळगावकर 6-0.