२०००मध्ये जन्म झालेल्या अाफ्रिदीने केली १९९६ला पदार्पण केलेल्या दूसऱ्या अाफ्रिदीची बत्ती गूल

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल)मध्ये जरी प्रेक्षकांची कमतरता जाणवत असेल तरी विक्रमांची मात्र कोणतीही कमतरता यात जाणवत नाही. पीएसएल२०१८मध्ये नेहमीप्रमाणे सर्वाधिक चर्चेत असलेले नाव अपेक्षेप्रमाणे ३८ वर्षीय शाहीद अाफ्रिदीचे आहे.

काल कराची किंग्ज विरूद्ध लाहोर क्वाॅलंडर्स सामन्यात पुन्हा एकदा  शाहीद अाफ्रिदीचे नाव चर्चेत आले. त्याचे कारण म्हणजे ३८ वर्षीय शाहीद आफ्रिदीला क्लीन बोल्ड केले ते १७ वर्ष आणि ३४० दिवस वय असणाऱ्या शाहीन आफ्रिदी नावाच्या खेळाडूने.

शाहीन आफ्रिदीचा जन्म हा शाहीद आफ्रिदीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर ४ वर्षींनी झाला हे विशेष. जेव्हा त्याने शाहीद आफ्रिदीला बाद केले तेव्हा तो सेलीब्रेशन करणार होता परंतू पून्हा त्याने तस न करता एक प्रकारे आफ्रिदीचा आदर केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कराची किंग्जने २० षटकांत ५ बाद १६३ धावा केल्या तर लाहोर क्वाॅलंडर्सलाही २० षटकांत ८ बाद १६३ धावा करता अाल्यामूळे हा सामना टाय झाला.

कोण आहे शाहीन आफ्रिदी:

शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या १९ वर्षाखालील संघाचा सदस्य असून त्याने प्रथम श्रेणीचे दोन सामने खेळले आहेत. त्यात त्याने १७.२४ च्या सरासरीने ११ विकट्स घेतल्या आहेत.

पहा हा विडीओ