या पाकिस्तानी क्रिकेटपटुंनी दिल्या विरुष्काला शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काल इटली देशात लग्नबंधनात अडकले. यावेळी काही जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते.

यानंतर विराट अनुष्काला विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. भारतीय संघाचे पारंपरीक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघातीलही अनेक क्रिकेटपटुंनी नवविवाहित दांपत्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यात शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, मोहम्मद आमिर, उमर अकमल आणि अझहर मेहमूद यांचा समावेश आहे.