शाहीद आफ्रिदी पुन्हा दिसणार क्रिकेट खेळताना

युएईत टी-20 एक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युएईच्या बोर्डाकडून करण्यात आले आहे. त्यात पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी लीग क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ह्या वर्षी निवृत्ती घेतली आहे.

त्याच्या सोबत अनेक दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये इऑन मॉर्गन, डेव्हिड मिलर आणि आंद्रे रसेल यांचा समावेश आहे.

ही स्पर्धा 19 डिसेंबर 2018 ला सुरू होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 11 जानेवारी 2019 ला  होणार आहे.

युएई टी-20 एक्स स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांने सांगितले कि शाहीद अफ्रिदी, सलमान बट् हे खेळाडू स्पर्धेचा चेहरा असणार आहेत. या स्पर्धेतील सामने नक्कीच चुरशीचे होतील.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला आधीच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्याला टी-20 खेळायला आवडत असल्याचे त्याने सांगितले.

शाहिदी आफ्रिदीने 99 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत तर  फलंदाजीत 91 डावात 150 स्ट्राइक रेटने 1416 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-२०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच असणार सर्वात वयस्कर संघ

-रोहित शर्माला कसोटी संघात न घेतल्यामुळे भज्जी भडकला!

-अशी आहे एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची यादी