आयपीएलपेक्षा पीएसएल कधीही भारी, बोलवलं तरी जाणार नाही- आफ्रिदी

भारताकडून २०१८च्या आयपीएलला जरी आमंत्रण आले तरी जाणार नाही असे वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने केले आहे.

याबद्दल पाकिस्तानमधील क्रीडा पत्रकार साज सादिक यांनी ट्विट केला आहे. त्यात त्यांनी आफ्रिदीचे हे वक्तव्य ट्विट केले आहे. 

“जरी त्यांनी मला आयपीएल खेळायला बोलवले तरी मी जाणार नाही. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) ही मोठी आहे आणि एक दिवस पीएसएल इंडियन प्रीमियर लीगलाही (आयपीएल) मागे टाकेल. मी पीएसएलचा आनंद घेत आहे आणि मला आयपीएल खेळायची गरज नाही. मला आयपीएलमध्ये यापुर्वीही कधी रस नव्हता आणि आताही नाही. ” असे त्याने म्हटले आहे. 

 पीएसएलमध्ये हा खेळाडू कराची किंग्ज या संघाकडून खेळतो. 

काही दिवसांपुर्वीच आफ्रिदीने आयपीएलचे जोरदार कौतूक केले होते. पाकिस्तानच्या ज्या खेळाडूंनी एकेकाळी अायपीएलमध्ये भाग घेतला होता त्यात आफ्रिदीचाही समावेश होता. त्याने डेक्कन चार्जेर्स कडून पहिल्या पर्वात भाग घेतला होता.