कोहलीपेक्षा मी लांब षटकार मारतो, मग कशाला कमी खायचं

जर मी कोहलीपेक्षा लांब षटकार मारु शकत असेल तर कशाला त्याच्यासारखा डायट करु असे मत व्यक्त केले आहे अफगाणिस्तानचा य़ष्टिरक्षक मोहम्मद शाहजादने. 

९० किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन असलेला हा खेळाडू कोहलीच्या डायटच्या पुर्ण विरोधात आहे. 

“आम्ही फिटनेसवर १००% ध्यान देतो आणि आम्ही जेवणातपण कोणती कसर सोडत नाही. ते पण १००% करतो. माझ्याकडून कोहलीसारखे रोज व्यायाम करणे किंवा डायट करणे जमणार नाही. परंतु मी यावर काम करत आहे. ” असे हा खेळाडू म्हणाला. 

त्याने यावेळी कोहलीच्या षटकारच्या क्षमतेबद्दलही भाष्य केले. 

“तो जेवढा लांब षटकार मारतो, त्यापेक्षा लांब षटकार तर मी मारु शकतो. विराट सारखा डायटची काय गरज आहे.” असेही तो पुढे म्हणाला. 

गेल्याच महिन्यात अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने  मोह्म्मद शहजादला नोटीस बजावत एक महिन्याच्या आत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. शहजादने अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाच्या परवानगी शिवाय पाकिस्तानमधील स्थानिक स्पर्धेत भाग घेतला होता.  त्यासाठी त्याला 2.5 लाखाचा  दंडही आकरण्यात होता.

मोह्म्मद शहजाद सध्या आयसीसी टी२० क्रमवारीत ९व्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही

बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज

सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?

लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर

धोनी, तु माझा देव आहेस!