बापरे! मांडी रक्तबंबाळ झालेली असतानाही वाॅटसन आयपीएल फायनलमध्ये लढला

हैद्राबाद | मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलचा अंतिम सामना १ धावेने जिंकल आयपीएलवर चौथ्यांदा नाव कोरले. या सामन्यात वाॅटसन शेवटच्या षटकात बाद झाला. तो संघाला विजय मिळवुन देण्यात जरी अपयशी ठरला असला तरी या सामन्यात त्याने सर्वाधिक ८० धावा केल्या.

परंतु आज त्याच्या या खेळीचे महत्त्व अधोरेखित करणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. वाॅटसन जेव्हा या सामन्यात खेळत होता तेव्हा त्याच्या मांडीला मोठी दुखापत झाली होती. त्याने ड्राईव्ह मारल्यामुळे त्याला मांडीला लागले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. परंतु त्याने संपुर्ण सामना होईपर्यंत हे कुणाला समजू दिले नाही.

“तुम्हाला वाॅटसनच्या मांडीला रक्त दिसत आहे का? या फायनलनंतर त्याच्या मांडीला जवळपास ६ टाके घालावे लागले. तो ड्राईव्ह मारताना जखमी झाला परंतु कुणालाही न सांगता शेवटपर्यंत खेळत राहिला.” असा ट्वीट आज हरभजन सिंगने केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

रैना झाला ८ धावांवर बाद आणि आयपीएलमधील खास विक्रमावर झाले कोहलीचे शिक्कामोर्तब

…म्हणून पोलार्डने रागाने हवेत फेकली बॅट, पहा व्हिडिओ

चक्क चाहत्याने मुंबई इंडियन्सला सुचवली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध जिंकण्याची योजना