सुप्रीमो चषक क्रिकेट स्पर्धेत शांतिरत्न प्रतिक इलेव्हनचा धडाकेबाज विजय

मुंबई: सुप्रीमो चषक आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या जोरदार विजयाची नोंद करीत उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले.

शांतिरत्न प्रतिकने यु.एस. इलेव्हनचे 71 धावांचे आव्हान अवघ्या फलंदाजाच्या मोबदल्यात पार पाडून उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि मग तिरूपती सावर्डे चिपळूण संघासमोर 87 धावांचे लक्ष्य ठेऊन त्यांना 74 धावांत रोखले.

टेनिस क्रिकेटलाही सोन्याचे दिवस यावे या ध्येयाने पछाडलेल्या क्रीडाप्रेमी आणि शिवसेना आमदार संजय पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सुप्रीमो चषक क्रिकेट स्पर्धेत क्रिकेटप्रेमींना आजही चांगल्या आणि दमदार लढती पाहायला मिळाल्या.

सुप्रीमो चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी झालेल्या लढतीत शांतिरत्न प्रतिक इलेव्हनने  अविनाश रामगुडेच्या 21 चेंडूंतील 4 चौकार आणि 2 षटकारांच्या झंझावातामुळे 6 बाद 86 धावांचा डोंगर उभारला.

अविनाशला पंकज जाधवचीही (14) साथ लाभली. तिरूपतीच्या अक्षय पाटीलने 19 धावांत 3 फलंदाज बाद करून शांतिरत्न प्रतिकच्या धावांना रोखण्याचा काहीसा प्रयत्न केला,पण त्याला विकेट्स मिळाल्या.

मात्र धावांचा वेग कमी झाला नाही.  मग 87 धावांचा पाठलाग करताना तिरूपती सावर्डेकडून प्रथमेश पवार (18), संदीप मकवाना(17) आणि विजय पावले (15) यांनी वेगवान खेळ केला, पण त्यांचा संघ 74 धावांपर्यंतच पोहचू शकला आणि शांतिरत्नने 12 धावांनी विजय नोंदविला.

त्याअगोदर शांतिरत्नने कृष्णा सातपुतेच्या 22 चेंडूंतील 42 धावांच्या फटकेबाज खेळीने संघाला 10 चेंडू आधीच विजय मिळवून दिला.

सातपुतेने एजाज कुरेशीबरोबर65 धावांची वेगवान सलामी दिल्यामुळे शांतिरत्नला विजयी लक्ष्य गाठताना कोणत्याही अडथळ्याला सामोरे जावे लागले नाही.

दुसरा साखळी सामना अत्यंत थरारक झाला. स्टार सीसी दांडी पालघरच्या प्रीतम बारीने शेवटच्या षटकांत 20 धावा कुटल्यामुळे त्यांना 5 बाद 67 अशी समाधान कारक मजल मारता आली होती आणि या धावांचा पाठलाग करताना नितीन माटुंगेच्या झंझावातामुळे हा सामना थरारकरित्या बरोबरीत सुटला.

नितीनने 11 चेंडूंत 3 षटकार आणि 2 चौकार खेचत नाबाद 30धावा ठोकल्या होत्या. या बरोबरीमुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. ज्यात स्टार सीसीने केवळ 8 धावा केल्या तर तिरूपती सावर्डेला 9 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना माटुंगेने उत्तुंग असा षटकार खेचत संघाला थरारक विजयश्री मिळवून दिली.

सुप्रीमो चषकाच्या इतिहासात सुपर ओव्हरमध्ये खेळला गेलेला हा चौथाच सामना आहे. त्यापैकी दोन सामने गेल्या तीन दिवसांतच झाले आहेत. एवढेच नव्हे तर  आजवरचा सर्वात थरारक आणि रोमहर्षक सामना म्हणून या लढतीची नोंद केली तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.

संक्षिप्त धावफलक

यु. एस. इलेव्हन मुंबई:  8 षटकांत 9 बाद 71 ( हनीफ शेख 11, रोहन साळुंखे 10, आतिष केदारे 10, तुषार रणदिवे 2 बळी, अभिजीत दुधे 2 बळी) पराभूत वि. शांतिरत्न प्रतिक इलेव्हन पुणे: 6.2 षटकांत 1 बाद 73 ( कृष्णा सातपुते 42, एजाज कुरेशी ना.24) सामनावीर: हनीफ शेख

 

स्टार सीसी दांडी पालघर: 8 षटकांत 5 बाद 67 ( प्रीतम बारी ना.21, गौतम आके 14, विजय पावले 8 धावांत 2 बळी) पराभूत विरूद्ध तिरूपती सावर्डे चिपळुण: 8 षटकांत 5 बाद 67 (नितीन माटुंगे ना. 30, आकिब 13, विवेक दवणे 12 धावांत 2 बळी)

 

सामना बरोबरीत आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये तिरूपती सावर्डे विजयी

 

सामनावीर: प्रीतम बारी

उपांत्यपूर्व फेरी: शांतिरत्न प्रतिक इलेव्हन पुणे:  8 षटकांत 6 बाद 86 ( अविनाश रामगुडे 42, पंकज जाधव 14, अक्षय पाटील 19 धावांत 3 बळी) विजयी वि. तिरूपती सावर्डे चिपळूण – 8 षटकांत 5 बाद 74 (प्रथमेश पवार 18, संदीप मकवाना 17, विजय पावले 15) सामनावीर: विजय पावले