शरण्या गवारे, सुदिप्ता कुमार, सिध्दांत बांठीया यांना एमएसएलटीए वार्षिक पुरस्कार प्रदान

मुंबई। सब-ज्युनियर राष्ट्रीय खेळाडू शरण्या गवारे, सुदिप्ता कुमार, सिध्दांत बांठीया, मिनी-ज्युनियर राष्ट्रीय खेळाडू गार्गी पवार, मानस धामने, वैष्णवी आडकर यांना 2017-18 या वर्षातील एमएसएलटीए वार्षिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारांचे वितरण प्रविण दराडे, एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देशपांडे, एमएसएलटीएचे खजिनदार सुधीर भिवापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय व राज्य स्तरावर अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळविणाऱ्या आणि आपल्या देशासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत असल्याचे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक गटातील अव्वल तीन खेळाडूंना 10 लाखांहून अधिक रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. श्रीराम गोखले यांना एमएसएलटीए सर्वोत्कृष्ट टेनिस ऑफिशियल म्हणून, तर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी बॉल कीड म्हणुन निवड झाल्याबद्दल जेनिका जयसन हीला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

तसेच, यावेळी हेमंत बेंद्रे, संदीप किर्तने, श्रीनिवास राव कोला, केदार शहा आणि आदित्य मडकेकर यांनी महाराष्ट्राला राष्ट्रीय विजेते व उपविजेते मिळवून दिल्याबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या डेक्कन जिमखाना, नवी मुंबई स्पोर्टस असोसीएशन, सोलापुर जिल्हा लॉन टेनिस संघटना, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया(सीसीआय), डॉ. जी.ए रानडे टेनिस सेंटर मुंबई, नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी यांचा गौरव करण्यात आला.

शिष्यवृत्ती मिळालेल्या खेळाडूंची यादी-

अर्जून कढे, आर्यन गोवीस, जयेश पुंगलिया, ऋतुजा भोसले, मिहीका यादव, आर्यन भाटीया, सिध्दांत बांठीया, गुंजन जाधव, फैज नस्याम, अमन तेझाबवाला, अर्जुन गोहड, शिवम कदम, दक्ष अगरवाल, मानस धामने, अर्णव पापरकर, काहिर वारीक, आरव मेहता, अभय नागराजन, विवान कारंडे, शरण्या गवारे, सालसा आहेर, सुदिप्ता कुमार, प्रेरणा विचारे, हर्षाली मांडवकर, रिचा चौगुले, अनर्घ गांगुली, गार्गी पवार, वैष्णवी आडकर, राधिका महाजन, ऋतुजा चाफळकर, इरा शहा, कायरा चेतनानी, आस्मी अडकर, नैनीका रेड्डी, आकृती सोनकुसरा, रुपेश नलावडे