6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस अचंता शरथ कमल, मधुरीका पाटकर, श्रीजा अकुला, मनुष शाह यांना विजेतेपद

सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबलटेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत  पुरूष गटातपीएसपीबीच्य अचंता शरथ कमलने  आरएसपीबीच्या अनिर्बन घोषचा तर महिला गटात पीएसपीबीच्या मधुरिका पाटकरने पीएसपीबीच्याच दिव्या देशपांडेचा पराभव करत विजेतेपद पटकावले. युथ गाटत मुलींमध्ये आरबीआयच्या श्रीजा अकुला हिने पश्चिम बंगालच्या प्राप्ती सेनचा तर मुलांच्या गटात गुजरातच्या मनुष शाहने हरीयाणाच्या जीत चंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूष गटात अंतिम फेरीत पीएसपीबीच्य अचंता शरथ कमलने  आरएसपीबीच्या अनिर्बन घोषचा 4-0(11-6, 11-8, 11-3, 11-5)  असा पराभव करत विजेतेपद पटकावले. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पीएसपीबीच्या अचंता शरथ कमलने अमलराज अँथोनीचा4-3(12/14,7/11,11/9,14/12,11/7,9/11,13/11)असा संघर्षपूर्ण पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. आरएसपीबीच्या अनिर्बन घोषने पीएसपीबीच्या सनील शेट्टीचा 4-3( 11/9,11/9,10/12,11/9,9/11,8/11,11/9)असा सनसनाटी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. वितेजेपदा बद्दल बलताना अचंता म्हणाला की, अनिर्बन हा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने स्पर्धेदरम्यान मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवला आहे, मात्र या सामन्यात तो माझ्यावर दबाव आणु शकला नाही त्यामुळे मी चांगली कामगिरी करू शकलो व विजेतेपद मिळवले.

पीएसपीबीच्या मधुरिका पाटकरने पीएसपीबीच्याच दिव्या देशपांडेचा संघर्षपुर्ण लढतीत 4-2(7-11, 10-12, 11-8, 11-9, 12-10, 11-5) असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. पहिले दोन  सेट गमावल्यानंतर मधुरीकाने आक्रमक खेळी करत शेवटचे चारही सेट जिंकुन विजेतेपद पटकावले.याआधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पीएसपीबीच्या मधुरिका पाटकरने दुसऱ्या मानांकित मनिका बात्राचा  4-2(10/12,11/1,13/11,6/11,11/9,12/10)असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद करत अंतिम फेरीत धडक मारली होती. मधुरिका पाटकर म्हणाली कि, सामन्याच्या सुरुवातीला शुल्लक चुकांमुळे मला संघर्ष करावा लागला.  सामन्यात 2-0अशा फरकाने पिछाडीवर असताना मी माझ्या खेळात नवीन रणनिती आखत पुढील दोन्ही गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतरदेखील मी माझ्या खेळात सातत्य राखले व सामन्यात विजय मिळवला. या स्पर्धेमुळे मानांकीत खेळाडूंबरोबर खेळता आल्याने मला माझ्या खेळात आणखी सुधारणा करता आली. बेल्जीयम येथे होणाऱ्या आगामी प्रो टेबल टेनिस लीग स्पर्धेत मधुरीका सहभागी होणार आहे. मधुरिका हि मुंबई येथील बूस्टर्स टेबल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक शैलेजा गोहड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

युथ मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत आरबीआयच्या श्रीजा अकुला हिने पश्चिम बंगालच्या प्राप्ती सेनचा 4-3(11-7, 5-11, 11-9, 14-16, 11-9, 9-11, 12-10)असा संघर्षपूर्ण पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. श्रीजा ही उस्मानिया युनिव्हर्सिटी वाणिज्य शाखेत शिकत असून एमएलआर टेबल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक सोमनाथ घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

युथ मुलांच्या गटात एकतर्फी झालेल्या लढतीत गुजरातच्या मनुष शाहने हरीयाणाच्या जित चंद्राचा 4-0(11-6, 12-10, 12-10, 13-11) असा पराभव करत युथ गटाचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रक्कमेची असे पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव एम.पी.सिंग, बॅडमिंटन ऑलंपियन निखिल कानिटकर, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे सल्लागार धनंजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयकर विभागाचे सहआयुक्त मिलिंद चहुरे, सिम्बायोसिस स्पाचे संचालक डॉ.सतीश ठिगळे, एमएसटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस, एमएसटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, स्पर्धा संचालक राजेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: उपांत्य फेरी:
अचंता शरथ कमल(पीएसपीबी)वि.वि.अमलराज अँथोनी(पीएसपीबी) 4-3(12/14,7/11,11/9,14/12,11/7,9/11,13/11;
अनिर्बन घोष(आरएसपीबी)वि.वि.सनील शेट्टी(पीएसपीबी) 4-3( 11/9,11/9,10/12,11/9,9/11,8/11,11/9);

पुरुष गट: अंतिम फेरी:
अचंता शरथ कमल(पीएसपीबी)वि.वि. अनिर्बन घोष(आरएसपीबी) 4-0(11-6, 11-8, 11-3, 11-5)

महिला गट: उपांत्य फेरी:
दिव्या देशपांडे(5)(पीएसपीबी)वि.वि.सागरिका मुखर्जी(आरएसपीबी) 4-1(11/6,11/7,11/1,9/11,11/6);
मधुरिका पाटकर(4)(पीएसपीबी)वि.वि.मनिका बात्रा(पीएसपीबी) 4-2(10/12,11/1,13/11,6/11,11/9,12/10).

महिला गट: अंतिम फेरी: 

मधुरिका पाटकर(4)(पीएसपीबी)वि.वि. दिव्या देशपांडे(5)(पीएसपीबी) 4-2(7-11, 10-12, 11-8, 11-9, 12-10, 11-5)

युथ गट: मुली: अंतिम फेरी: श्रीजा अकुला(1)(आरबीआय) वि.वि.प्राप्ती सेन(4)(पश्चिम बंगाल) 4-3(11-7, 5-11, 11-9, 14-16, 11-9, 9-11, 12-10)

युथ गट: मुले: अंतिम फेरी:

मानुष शाह(6)(गुजरात) वि.वि जित चंद्रा(1)(हरीयाणा) 4-0(11-6, 12-10, 12-10, 13-11)

महत्वाच्या बातम्या-