म्हणून शार्दूल ठाकूर वापरतो सचिनच्या १० क्रमांकाची जर्सी

श्रीलंकेविरुद्ध चौथ्या सामन्यात १० नंबरची जर्सी घातल्यामुळे सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या शार्दूल ठाकूरने ही जर्सी घालण्याचे कारण स्पष्ट केले आहे.

सचिन कारकिर्दीच्या उत्तरार्धात १० क्रमांकाची जर्सी वापरात असे. सुरुवातीचा काही काळ १० क्रमांकाची जर्सी वापरल्यानंतर सचिनने ९९ क्रमांकाची जर्सी वापरायला सुरुवात केली. त्यापुढे एकदिवसीय क्रिकेटमध्ये जर्सी वापरता येत नाही.

टेनिस एल्बो दुखापतीमधून सावरल्यावर सचिनने २००४ साली पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध जबदस्त कमबॅक केले. तेव्हा सचिनचा मोठा भाऊ अजितने त्याला ३३ क्रमांकाची जर्सी वापरायला सांगितले.

२००७ साली पुन्हा तो विश्वचषक लढतींपासून १० क्रमांकाची जर्सी घालू लागला आणि क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत तो तीच जर्सी घालत असे.

शार्दूल ठाकूरने आपण ही जर्सी का घालत आहे हे मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. त्याच्या जन्मतारखेची बेरीज ही बरोबर दहा होत असल्या कारणाने तो त्या क्रमांकाची जर्सी वापरतो असे तो म्हणाला. शार्दूलची जन्मतारीख आहे १६/१०/१९९१.

विशेष म्हणजे शार्दूल ठाकूर आणि सचिन तेंडुलकर या दोघांच्याही नावाची आद्याक्षरेही ST आहेत.