Breaking: सचिनची जर्सी नंबर १० यापुढे हा खेळाडू घालणार

कोलंबो. श्रीलंका । येथे सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात मुंबईकर शार्दूल ठाकूरला जर्सी नंबर १० देण्यात आला आहे. एकावेळी ह्या क्रमांकाची जर्सी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर घालत असे.

ही जर्सी भारतीय क्रिकेटमधून कायमची निवृत्त करण्यात यावी म्हणून सचिन फॅन्सने पाठीमागे मोठ्या प्रमाणावर कॅम्पेन देखील केले होते. आज शार्दूल ठाकूर जेव्हा भारताकडून पहिलच षटक टाकायला आला तेव्हा त्याने जर्सी क्रमांक १० घातलेला दिसला. विशेष म्हणजे शार्दूलला दुसऱ्याच षटकात यश मिळाले असून त्याने प्रतिभावान खेळाडू निरोशन डिकवेलला बाद केले.

१० क्रमांकाची जर्सी ही खास करून संघातील महत्वाच्या खेळाडूला दिली जाते. सचिनच्या क्रिकेट निवृत्तीनंतर ह्या क्रमांकाची जर्सी कोणत्याही खेळाडूने वापरली नव्हती. यामुळे मात्र शार्दूलवर सोशल माध्यमांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. शार्दूल ठाकूर आणि सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेटचा श्रीगणेशा मुंबई रणजी संघातूनच केला आहे.

शार्दूल ठाकूर हा मुंबईकर खेळाडू नोव्हेंबर २०१२ पासून मुंबई रणजी संघाचा सदस्य आहे. तब्बल ४९ प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या २५ वर्षीय शार्दूलने प्रथम श्रेणीमध्ये १६९ बळी घेतले आहे.

भारताकडून २०१७मध्ये वनडेमध्ये केवळ कुलदीप यादव या खेळाडूने पदार्पण केले होते तेव्हा त्याचा वनडे कॅप नंबर होता २१७. शार्दूल ठाकूर आता भारताचा २१८ वा वनडे खेळाडू आहे.