पृथ्वी शाॅने घातली आणखी एका अनोख्या विक्रमाला गवसणी

भारतीय संघाने विंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज(14 आॅक्टोबर) 10 गड्यांनी विजय मिळवला आहे. पदार्पणाच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शाॅने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात विंडिजने भारतासमोर 72 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर केएल राहुल आणि पृथ्वी शाॅने आक्रमक फलंदाजी करत हे आव्हान 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पुर्ण केले.

पृथ्वी शाॅने बिशूच्या 5 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्यामुळे भारतीय संघासाठी कसोटीत सर्वात कमी वयात(18 वर्ष आणि 339 दिवस) विजयी धाव घेण्याचा मान पृथ्वीने मिळवला आहे. जागतिक स्तरावर अशी कामगिरी करणारा पृथ्वी शाॅ दुसराच खेळाडू ठरला आहे.

आॅस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध 2011 साली वयाची 18 वर्षे आणि 198 व्या दिवशी ही कामगिरी केली होती.

याबरोबरच भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मायदेशात खेळलेल्या 8 पैकी 8 कसोटी मालिकांत विजय मिळवला आहे.

भारतीय संघाने मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. अशी कामगिरी करणारा भारत हा आॅस्ट्रेलियानंतर दुसराच संघ ठरला आहे.

आॅस्ट्रेलियाच्या संघाने ही कामगिरी दोनदा केली आहे. आॅस्ट्रेलियाने मायदेशात 1994 ते 2001 या दरम्यान सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर 2004-2008 दरम्यान देखील आॅस्ट्रेलियाने मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या होत्या.

मायदेशात सलग10 कसोटी मालिका जिंकणारे संघ-

10 – आॅस्ट्रेलिया (1994-2001)

10 – आॅस्ट्रेलिया (2004-2008)

10 – भारत (2013 – 2018*)

महत्वाच्या बातम्या-