टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप, रिग्रीन संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे । डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसयांच्या तर्फे आयोजित पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप, रिग्रीन या संघांनी सलग दुसरा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

धायरी येथील स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी व व्हिजन स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात सोनिया डबीर(78धावा)हिने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर शेलार ग्रुप संघाने मेटा स्कुलचा 7 गडी राखून पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

मेटा स्कुल संघाने 20षटकात 5बाद 128धावा केल्या. यात रोहिणी मोरे नाबाद 41, पूनम खेमनार 40, उत्कर्षा पवार 13, कल्याणी चावरकर 12यांनी संघाच्या डावाला आकार दिला. शेलार ग्रुपकडून कोमल झंझाद(2-16), तेजश्री ननावरे(1-12), सोनिया डबीर(1-26)यांनी अफलातून गोलंदाजी करत मेटा स्कुल संघाला 128धावांवर रोखले.

शेलार ग्रुप संघाने हे आव्हान 16षटकात 3बाद 129धावा करून पूर्ण केले. सोनिया डबीरने 45 चेंडूत 12 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 78धावांची धडाकेबाज खेळी केली. सोनियाला चार्मी गवईने 40 चेंडूत नाबाद 36धावांची संयमपूर्ण खेळी करत विजय मिळवून दिला. सामन्याची मानकरी सोनिया डबीर ठरली.

दुसऱ्या सामन्यात तेजल हसबनीसच्या 64धावांच्या खेळीच्या जोरावर रिग्रीन संघाने ईश्वरी ग्रुपचा 6 गडी राखून पराभव केला.पहिल्यांदा खेळताना ईश्वरी ग्रुप संघाने 20षटकात 7बाद 123धावा केल्या.

यात साक्षी कानडीने 34धावा, ऋतू भोसलेने 23धावा, श्रावणी देसाईने 14धावा व निकिता आगेने 10धावांची खेळी केली. रिग्रीनकडून प्रिया भोकरेने 20धावांत 3गडी, तर श्रद्धा पाखरकरने 19 धावांत 2गडी बाद केले. याच्या उत्तरात रिग्रीन संघाने 18.3षटकात 4गड्यांच्या बदल्यात 127धावा करून हे आव्हान पूर्ण केले.

यात तेजल हसबनीसने 50चेंडूत 9 चौकारांसह 64धावा व भक्ती शास्त्रीने 41चेंडूत 36धावा करून संघाला विजय मिळवून दिला.सामन्याची मानकरी तेजल हसबनीस ठरली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
मेटा स्कुल: 20षटकात 5बाद 128धावा(रोहिणी मोरे नाबाद 41(44,3×4), पूनम खेमनार 40(38,5×4), उत्कर्षा पवार 13(21,2×4), कल्याणी चावरकर 12(11), कोमल झंझाद 2-16, तेजश्री ननावरे 1-12, सोनिया डबीर 1-26)पराभूत वि.शेलार ग्रुप: 16षटकात 3बाद 129धावा(सोनिया डबीर 78(45,12×4,1×6), चार्मी गवई नाबाद 36(40,3×4), ईशा पठारे 1-19, कल्याणी चावरकर 1-19)सामनावीर-सोनिया डबीर;

ईश्वरी ग्रुप: 20षटकात 7बाद 123धावा(साक्षी कानडी 34(47,4×4), ऋतू भोसले 23(29,2×4), श्रावणी देसाई 14(11), निकिता आगे 10(11), प्रिया भोकरे 3-20, श्रद्धा पाखरकर 2-19, भक्ती शास्त्री 1-16)पराभूत वि.रिग्रीन: 18.3षटकात 4बाद 127धावा(तेजल हसबनीस 64(50,9×4), भक्ती शास्त्री 36(41,2×4), श्रावणी देसाई 2-6, शितल वर्मा 1-5, निकीता आगे 1-27);सामनावीर- तेजल हसबनीस;