चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरिज २०१९ स्पर्धेत अलिना शेख, मृणाल शेळके, सिमरन छेत्री यांचे सनसनाटी विजय

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत मुलींच्या गटात मृणाल शेळके, अलिना शेख, सिमरन छेत्री या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात अलिना शेख हिने अव्वल मानांकित कौशिकी समंथाचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. सिमरन छेत्रीने चौथ्या मानांकित श्रुती नानांजकरचा टायब्रेकमध्ये 6-5(5) असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले.

12 वर्षाखालील मुलींच्या गटात मृणाल शेळके हिने दुसऱ्या मानांकित मेहक कपूरचा 6-2 असा सहज पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात सोहम अमुंडकर याने सहाव्या मानांकित अनिश रांजळकरचा टायब्रेकमध्ये 6-5(4) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

उप-उपांत्यपूर्व फेरी: 14 वर्षाखालील मुले:

अर्जुन अभ्यंकर(1)वि.वि.आर्य वेलणकर 6-1;

अनन्मय उपाध्याय(7)वि.वि.अदनान लोखंवाला(11) 6-1;

सार्थ बनसोडे(4)वि.वि.केयूर म्हेत्रे 6-0;

आर्यन शहा वि.वि. प्रियांश प्रजापती 6-2;

निनाद मुळ्ये वि.वि.मोक्ष सुगंधी 6-2;

सोहम अमुंडकर वि.वि.अनिश रांजळकर (6) 6-5(4);

ईशान देगमवार (2)वि.वि.अर्णव बनसोडे 6-1;

पार्थ देवरुखकर(5)वि.वि.पार्थ वामन 6-1;

12 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:

काव्या देशमुख(1)वि.वि.अविपशा देहुरी 6-0;

श्रावणी देशमुख वि.वि.गायत्री पाटील 6-0;

दुर्गा बिराजदार(3)वि.वि.सहणा कमलाकन्नन(6)6-5(3);

मृणाल शेळके वि.वि.मेहक कपूर(2) 6-2;

14 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:

अलिना शेख वि.वि.कौशिकी समंथा(1) 6-4;

सिमरन छेत्री वि.वि.श्रुती नानांजकर(4) 6-5(5);

मयूखी सेनगुप्ता(7) वि.वि.मेहक कपूर 6-0;

संचिता नगरकर(2)वि.वि.समृद्धी भोसले(5) 6-2.