15व्या अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीअखेर महाराष्ट्राचा सम्मेद शेटे आघाडीवर

सम्मेद शेटे याचा आंतरराष्ट्रीय मास्टर  रत्नकरन के  याला पराभवाचा धक्का 

पुणे: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित 15व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचा सम्मेद शेटे याने रेल्वेच्या व आंतरराष्ट्रीय मास्टर रत्नकरन के   याचा पराभव करून 6.5गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे.

अश्वमेध सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत  महाराष्ट्राचा सम्मेद शेटे याने आपल्या विजयी मालीकेत सातत्य राखत रेल्वेच्या तीस-या मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर रत्नाकरन के याला पराभवाचा धक्का देत 6.5 गुण प्राप्त केले. सम्मेदने बी06 किंग पॉन फिन्चीटो पध्दतीने सुरूवात करत  रत्नकरनवर 33चालींमध्ये मात केली व सनसनाटी निकाल नोंदविला.

जाईल दिगंबरने फिमेल मास्टर एस.जी.जोशीचा पराभव करत आश्चर्यकारक निकालाची नोंद करत 5.5गुणांची कमाई केली. महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने गोव्याच्या रित्वीज परबवर विजय मिळवत 6.5  गुण मिळवले.

महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय मास्टर  समीर काठमळे तामिळनाडूच्या ग्रँडमास्टर सुंदराराजन किदांबीशी बरोबरी करत 5.5 गुण मिळवले.

 

स्पर्धेचा सविस्तर निकालः सातवी फेरीः(व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार)ः 

सम्मेद शेटे(महा)(6.5गुण)वि.वि.  आयएम रत्नाकरन के (रेल्वे)5.5गुण)

आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(महा)(6.5गुण) वि.वि रित्वीज परब(गोवा)(5.5गुण)

आयएम समीर काठमळे(महा)(5.5गुण)बरोबरी वि.ग्रँडमास्टर सुंदराराजन किदांबी(तामिळनाडू)(5.5गुण)

एजीएम किरण पंडीतराव(सीआरएसबी)(5.5गुण) बरोबरी वि. आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसु(ओडिसा)(5.5गुण)

हेरंब भागवत(महा)(5गुण) पराभूत वि  हरिकृष्णा ए.आरए(तामिळनाडू)(6गुण)

मुथय्या एएल(तामिळनाडू)(5.5गुण)वि.वि. मनिष जोशी  (रेल्वे)(4.5गुण)

कशिष जैन(महा)(4.5 गुण) पराभूत वि आयएम अभिषेक केळकर(सीआरएसबी)(5.5गुण)

एफएम सोहन फडके(महा)(5.5गुण) वि.वि संजीव नायर(महा)(4.5गुण)

अतुल डहाळे(महा)(5गुण)बरोबरी वि. वेदांत पिंपळखरे(महा)(5गुण)

एफएम मट्टा विजय कुमार(आंध्रप्रदेश)(5.5गुण) वि.वि.  आर्यन शहा(महा)(4गुण)

जाईल दिगंबर(महा)(5.5गुण) वि.वि एफएम एस.जी.जोशी(महा)(4गुण)

डब्ल्युआयएम चंद्रेयी हजरा(पश्चिम बंगाल)(5गुण) वि.वि एएफएम अर्णव मेहेते(महा)(4गुण)

एआयएम राकेश कुलकर्णी(महा)(4.5गुण) वि.वि अयुष महाजन(महा)(3.5गुण)

जयंत काटदरे(महा)(5.5गुण) वि.वि प्रणित कोठारी(महा)(4.5गुण)

कपिल लोहाना(महा)(5गुण) वि.वि रोहित मोकाशी(महा)(4.5गुण)

शुभम कुमठेकर(महा)(5गुण) वि.वि कुशार्ग जैन(महा)(4गुण)