5व्या अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर महाराष्ट्राचा सम्मेद शेटे आघाडीवर

सम्मेद शेटे याचा आंतरराष्ट्रीय मास्टर सत्यप्रग्यान स्वयंगसु याला पराभवाचा धक्का 

पुणे: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित 15व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचा सम्मेद शेटे याने ओरिसाच्या व आंतरराष्ट्रीय मास्टर सत्यप्रग्यान स्वयंगसु याचा पराभव करून 5गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे.

अश्वमेध सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीत  महाराष्ट्राचा सम्मेद शेटे याने ओरिसाच्या व दुसऱ्या मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर सत्यप्रग्यान स्वयंगसुला पराभवाचा धक्का देत 5प्राप्त केले.

सम्मेदने किंग पॉन पध्दतीने सुरूवात करत लक्ष्मणवर 45 चालींमध्ये मात केली व सनसनाटी निकाल नोंदविला. तामिळनाडूच्या  हरिकृष्णा ए.आरए याने रेल्वेच्या आयएम रत्नाकरन के याला बरोबरीत रोखत 4.5गुण मिळवले. तामिळनाडूच्या मुथय्या एएल याने महाराष्ट्राच्या हेरंब भागवतवर विजय मिळवत 4.5गुण मिळवले.

 

स्पर्धेचा सविस्तर निकालः पाचवी फेरीः(व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार)ः 

सम्मेद शेटे(महा)(5गुण)वि.वि.आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसु(ओडिसा)(4गुण);

हरिकृष्णा ए.आरए(तामिळनाडू)(4.5गुण)बरोबरी वि.आयएम रत्नाकरन के (रेल्वे)(4.5गुण);

मुथय्या एएल(तामिळनाडू)(4.5गुण)वि.वि.हेरंब भागवत(महा)(4गुण);

एफएम अमेय ऑडी(गोवा)(4.5गुण)वि.वि.एफएम एस.जी.जोशी(महा)(3.5गुण);

एफएम मट्टा विजय कुमार(आंध्रप्रदेश)(4.5गुण) वि.वि.आयएम अभिषेक केळकर(सीआरएसबी)(3.5गुण);

इंद्रजीत महिंद्रकर(महा)(3.5गुण)पराभूत वि.आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(महा)(4.5गुण);

रित्वीज परब(गोवा)(4.5गुण)वि.वि.संजीव नायर(महा)(3.5गुण);

अतुल डहाळे(महा)(4गुण)बरोबरी वि.ग्रँडमास्टर सुंदराराजन किदांबी(तामिळनाडू)(4गुण)

आयएम समीर काठमळे(महा)(4गुण)वि.वि.वेदांत पिंपळखरे(महा)(3.5गुण)

कपिल लोहाना(महा)(4गुण) वि.वि.आयुष महाजन(महा)(3गुण)

एजीएम किरण पंडीतराव(सीआरएसबी)(4गुण)वि.वि.तनिषा बोरमाणीकर(महा)(3गुण)

स्वप्नील कांत(महा)(3गुण)पराभूत वि.सिद्धांत गायकवाड(महा)(4गुण)

डब्ल्युआयएम चंद्रेयी हजरा(पश्चिम बंगाल)(4गुण)वि.वि.रोहित मोकाशी(महा)(3गुण)

पंकीत मोटा(महा)(4गुण)वि.वि.एएफएम अर्णव नेहेते(महा)(3गुण);

एल.पीखाडिलकर(महा)(3.5गुण) बरोबरी वि.आर्यन शहा(महा)(3.5गुण).