पहिली कसोटी: शिखर धवनने मोडले ६३ वर्ष जुने रेकॉर्ड

भारताचा सलामीवीर शिखर धवनने आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना ६३ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. लंच आणि टी ब्रेक या मधल्या सत्रात त्याने विक्रमी १२६ धावा केल्या आहेत.

यापूर्वी १९५४ साली डी. क्रॉम्प्टन यांनी या सत्रात तब्बल १७३ धावा केल्या होत्या. त्यांनतर कोणत्याही खेळाडूला १२६ पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत.

लंच आणि टी ब्रेक या मधल्या सत्रात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१७३ डी. क्रॉम्प्टन, १९५४
१५० डब्लू. हम्मोन्ड, १९३३
१२७ एस. मक्बबे, १९३८
१२६ शिखर धवन, आज