शिखर धवनचा धमाका, केले हे खास विक्रम

विशाखापट्टणम । निर्णायक वनडे सामन्यात ८ गडी राखत भारतीय संघाने विजय मिळवला. याबरोबर भारतीय संघाने श्रीलंका संघाविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली.

या सामन्यात भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवनने नाबाद १०० धावा केल्या. त्याला ६५ धावा करून श्रेयस अय्यरने तर २६ धावा करून दिनेश कार्तिकने चांगली साथ दिली.

या सामन्यात शिखर धवनने काही खास विक्रम केले. ते असे-

१. वनडेत कमी डावात १२ शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शिखर धवन ५वा. ९५ डावात केली १२ शतके. या यादीत डिकॉक (७४) अव्वल तर विराट कोहली (८३) तिसरा.

२.कमी डावात ४००० धावांचा टप्पा पार करणारा शिखर धवन दुसरा भारतीय. ९५ डावात ४००० धावा. विराट (९३), गांगुली (१०५), सिद्धू(१०८), गंभीर(११०) आणि तेंडुलकर(११२) हे यादीत पहिल्या ६ क्रमांकावरील खेळाडू आहेत.

३.वनडेत ४ हजार धावांचा टप्पा कमी डावात पार करणारा जगातील ६वा खेळाडू. ८१ डावात हाशिम अमलाने ही कामगिरी केली होती.

४.सलामीवीर म्हणून ४००० धावा कमीतकमी डावात करणारा शिखर धवन जगातील ३रा तर भारतातील दुसरा खेळाडू. रोहित शर्मा अव्वल.

५. यावर्षी श्रीलंका संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा शिखर धवन विराट कोहली नंतर दुसरा खेळाडू