एवढी चांगली खेळी केलेल्या त्या खेळाडूचे नावच विसरला शिखर धवन

मोहाली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी(10 मार्च) चौथा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताला 4 विकेटने पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-2 अशी बरोबरी ऑस्ट्रेलियाने साधली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात नवोदित खेळाडू ऍश्टन टर्नरने 43 चेंडूत केलेली नाबाद 84 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 359 धावांचे आव्हान सहज पार केले.

त्यामुळे अशा खेळीनंतर टर्नरचे नाव भारतीय चाहते तरी विसरणार नाही, मात्र भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन टर्नरचे नाव विसरला होता.

या सामन्यात धवनने 143 धावांची शतकी खेळी केली आहे. त्यामुळे तो सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. त्यावेळी त्याला टर्नरच्या खेळाबद्दल विचारल्यावर त्याचे कौतुक धवनने केले, पण तो टर्नरचे नाव मात्र विसरला त्यामुळे त्याने त्याला ‘तो खेळाडू’ असे म्हणून संबोधले.

धवन पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला, ‘तो नवीन खेळाडू आहे पण, आम्हाला माहित आहे. तो याआधीही खेळला आहे. नक्कीच त्या खेळाडूने चांगली खेळी केली. त्या खेळीने आमच्यापासून सामना दूर गेला.’

धवनच्या या नाव विसरण्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटवर बातमी देताना मजेशीर शीर्षक दिले आहे. त्यांनी ‘ऍश कोण? तो खेळाडू, ज्याने भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले’ अशा अर्थाचे शीर्षक दिले आहे.

तसेच शिखरने म्हटले आहे की मैदानात संध्याकाळी दव पडल्याने त्याचा भारताला मोठा फटका बसला.

टर्नरबरोबरच पिटर हँड्सकॉम्बने 117 आणि उस्मान ख्वाजाने 91 धावांची खेळी केली. टर्नरचा हा दुसराच वनडे सामना होता. त्याने केलेल्या या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या –

हत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे मॅच फिक्सिंग- एमएस धोनी

कारकिर्दीतील पहिलाच षटकार मारणाऱ्या बुमराहचा हा अनोखा कारनामा…

बुमराहचा तो षटकार पाहुन कर्णधार कोहलीही झाला अचंबित, केले असे सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ