टीम इंडियाला मोठा धक्का, शिखर धवन विश्वचषकातून बाहेर

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 विश्वचषकात भारताने आत्तापर्यंत केवळ 2 सामने खेळले आहेत. अशातच भारतासाठी मोठी धक्कादायक बातमी आली आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन या विश्वचषकातून पुढील 3 आठवड्यांसाठी बाहेर पडला आहे.

त्याला रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात डाव्या आंगठ्याची दुखापत झाली होती. त्याला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंन्सने टाकलेला एक चेंडू आंगठ्याला लागला होता. त्यानंतर त्याला वेदना झाल्या होत्या. तसेच त्याच्यावर लगेचच भारताचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हाट यांनी उपचार केले होते.

या दुखापतीनंतरही त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 109 चेंडूत 117 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

पण तो या सामन्यात आंगठ्याच्या दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणासाठी उतरला नव्हता. त्याच्याऐवजी पूर्ण 50 षटकात रविंद्र जडेजाने राखीव क्षेत्ररक्षक म्हणून क्षेत्ररक्षण केले होते.

भारताचा पुढील सामना 13 जूनला न्यूझीलंड विरुद्ध असून आता भारतीय संघ त्याच्याऐवजी कोणाला संधी देणार हे पहावे लागणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

युवराजने सांगितले, गांगुली की धोनी, कोण आहे सर्वोत्तम कर्णधार

‘युवराज’ म्हणजे…

युवराज पाठोपाठ हे पाच खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती