शेवटच्या दोन वनडेत या मोठ्या खेळाडूला वगळले !

इंदोर । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची शेवटच्या दोन वनडे सामान्यांसाठी घोषणा झाली आहे. दुखापतग्रस्त अक्सर पटेलने संघात पुनरागमन केले असून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला संघातून वगळण्यात आले आहे.

चेन्नई वनडे पूर्वी अक्सर पटेल हा दुखापतग्रस्त झाल्यामुळे जडेजाला संघ व्यवस्थापनाने लगेच बोलावूं घेतले होते. परंतु कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे जडेजाला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करताना जडेजाने २ झेल घेतले हीच त्याची या मालिकेतील कामगिरी ठरली.

शिखर धवनची माघार

शिखर धवनही शेवटच्या दोन सामन्यात भाग घेणार नाही. आधी तो कौटुंबिक कारणामुळे पहिल्या तीन वनडे सामन्यातून बाहेर पडला होता. त्यामुळे एकूणच वनडे मालिकेत शिखरला एकही सामन्यात भाग घेता येणार नाही.

२८ सप्टेंबर रोजी पुढचा सामना बेंगलोर शहरात होत असून शेवटचा वनडे सामना नागपूर शहरात १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक फलंदाज), केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहमंद शमी, भुवनेश्वर कुमार