शिखर धवनचा मुलाबरोबर पकडापकडी खेळतानाचा एक खास व्हिडिओ

भारताचा सलामीवीर आणि गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदामधील स्टार शिखर धवनने आपल्या मुलाबरोबर खेळतानाचा एक खास व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला शिखरने एक खास कॅप्शन सुद्धा दिले आहे.

ज्यात शिखर म्हणतो , ” झोरावरबरोबर पकडा पकडी हा खेळ खेळतोय. गवतावर अनवाणी पायांनी फिरणे शरीरासाठी चांगले असते.”

सध्या भारतीय संघ इंग्लंड मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची तयारी करत असून भारताने पहिले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. भारताचा पहिला सामना ४ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर बर्मिंघम येथे होत आहे.