शिखर धवनचा पत्नीसाठी भावनिक संदेश

दिल्ली । न्यूजीलँड विरुद्ध केलेल्या जबदस्त कामगिरीमुळे शिखर धवन सध्या आनंदात आहे. याचबरोबर त्याला आनंदी राहण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे ते म्हणजे काल त्याच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस होता.

भारताच्या या सलामीवीराने सोमवारी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने ट्विटरवरून खास संदेश पाठवून पत्नी ऐशा धवनला शुभेच्छा दिल्या.

धवन आपल्या ट्विटमध्ये लिहितो, ” साथ रहे हमारा जन्मो जन्मो तक करता हूँ ये दुवा, तेरे दर पे झुंके सर मेरा, मेरी यही हैं रजा. तुला लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. “

भारतीय संघ उद्यापासून न्यूजीलँड विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी सज्ज होत आहे. हा सामना दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे.

आज भारतीय संघातील खेळाडू फिरोजशाह कोटला मैदानावर टी२० सराव करणार आहे. हा सामना दिग्गज वेगवान गोलंदाज नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.