ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार शिखर धवन विश्वचषकातून बाहेर

भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि सलामीवीर शिखर धवन विश्वचषकातून ३ आठवड्यांसाठी बाहेर पडला आहे. शिखर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात जखमी झाला होता. तो त्यावेळी क्षेत्ररक्षणासाठी देखील मैदानात उतरला नव्हता. रविद्र जडेजाने तेव्हा त्याच्या जागी क्षेत्ररक्षण केले होते.

त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. शिखर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला होता.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)