दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवन संघात

२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवनची संघात वर्णी लागली आहे. भारत या दौऱ्यात एकूण ३ कसोटी सामने खेळणार असून मुरली विजय हा सलामीवीर म्हणून संघासोबत जाणार होता.

शिखर धवन यापूर्वी सप्टेंबर महिन्यात न्युझीलँड विरुद्ध दिल्ली येथे शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. अभिनव मुकुंद, के. एल. राहुल हे दोन सलामीवीर या दौऱ्यात असून आता शिखर धवनचाही समावेश झाला आहे.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार) , के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), रोहीत शर्मा, रविचंद्रन आश्विन, वृद्धिमान सहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दीक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, शिखर धवन

संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना २६ ते ३० जुलै गॅले
दुसरा कसोटी सामना ३ ते ७ ऑगस्ट कोलंबो
तिसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑगस्ट कॅंडी

पहिला एकदिवसीय सामना २० ऑगस्ट डॅबुल्ला
दुसरा एकदिवसीय सामना २४ ऑगस्ट कॅंडी
तिसरा एकदिवसीय सामना २७ ऑगस्ट कॅंडी
चौथा एकदिवसीय सामना ३१ ऑगस्ट कोलंबो
पाचवा एकदिवसीय सामना ३ सप्टेंबर कोलंबो

एकमेव टी-२० सामना ६ सप्टेंबर कोलंबो