दो मस्ताने चले जिंदगी बनाने, शिखर धवनकडून विराट-अनुष्काला खास शुभेच्छा !

अखेर तो क्षण आला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अधिकृतरित्या विवाहबद्ध झाले. अखेर अनेक आठवड्यांच्या या अनुमानांना अखेर पूर्ण विराम मिळाला.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा फ्लॉरेन्स, इटली येथे विवाहबद्ध झाले. काल सकाळी लग्नसमारंभ पार पडला. या वेळी त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.

आज विराटचा संघसहकारी आणि दिल्लीकर मित्र शिखर धवनने एक खास फोटो शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक जुना फोटो शेअर करत शिखरने शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात शिखर धवन, त्याचा परिवार एका गाडीवर आणि दुसऱ्या गाडीवर विराट अनुष्का आहेत.

आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये शिखर धवन म्हणतो, ” दो मस्ताने चले जिंदगी बनाने. तुम्हाला लग्नाच्या आणि सुखी जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा. “