म्हणून शिखर धवनच्या कुटुंबाला दुबई विमानतळावर अडवले

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनच्या कुटुंबाला दुबई विमानतळावर कागदपत्रांच्या चौकशीसाठी थांबवण्यात आले होते. याबद्दल दक्षिण आफ्रिकेत पोहचल्यावर शिखर धवनने ट्विट करून नाराजी व्यक्त केली.

शिखर धवन जेव्हा परिवारासोबत केपटाउन शहराकडे दुबई मार्गे कनेक्टिंग फ्लाइटने जात होता तेव्हा त्याच्या परिवारातील सदस्यांकडे कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. त्यात जन्मदाखला आणि बाकी कागपत्रांचा समावेश होता.

“हे वर्तन अतिशय चुकीचे होते. यावेळी माझ्या बायको आणि मुलांना जन्मदाखला आणि अन्य कागदपत्रांबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ती कागपत्रे नक्कीच आमच्याकडे नव्हती. ते आता दुबई विमानतळावरच आहेत. ते कागपत्रांची वाट पाहत आहेत. या खाजगी कंपनीने ही सर्व कागदपत्रे मुंबई विमानतळावरच का विचारली नाहीत. या खाजगी कंपनीचा एक कर्मचारी तर अतिशय चुकीचा वागत होता. 

आज असाच काहीसा अनुभव ट्विटरच्या माध्यमातून इंग्लडच्या केविन पीटरसनने व्यक्त केला आहे.