सलामीवीर शिखर धवनने अखेर मौन सोडले, पराभवावर दिली अशी प्रतिक्रिया

0 234

केप टाउन । अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाठोपाठ आता शिखर धवननेही ट्विटरच्या माध्यमातून पराभवावर भाष्य केलं आहे. पराभवामुळे दुःख झाले असले तरी महत्वाचे म्हणजे आम्ही सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण आहोत असे त्याने म्हटले आहे.

४ जानेवारीपासून हार्दिक पंड्या या एकमेव खेळाडूने पराभवानंतर ट्विट करत आपले मत व्यक्त केले होते. आज शिखर धवनने पुढे येत यावर आपले मौन तोडले आहे. ” पराभूत होणे हे खरंच खूप वाईट होते. परंतु आम्ही पराभवही सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण आहोत हे महत्वाचे आहे. पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करू. ” असे शिखर धवन ट्विटमध्ये म्हणाला.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना सेन्चुरियनला १३ जानेवारीपासून होणार आहे. या सामन्यात शिखर धवनला संघ व्यवस्थापन संघात कायम ठेवण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याजागी केएल राहुलला संधी मिळू शकते.

Comments
Loading...
%d bloggers like this: