धोनी म्हणतो, भगवान मुझे नहीं इसको उठाले !

कॅप्टन कूल असणारा एम.एस.धोनी त्याच्या शांत स्वभावामुळेच नाही तर त्याच्या विनोदी स्वभावामुळेही ओळखला जातो. असच एक धोनीचं विनोदी वाक्य शिखर धवनने सांगितले आहे.

एनडीटीव्हीशी बोलताना शिखर म्हणाला की “जेव्हा धोनी शिंकतो तेव्हा तो म्हणतो ‘भगवान मुझे नहीं इसको उठाले’ “ अशा विनोदी गोष्टींसाठी माजी कर्णधार धोनी ड्रेसिंग रूममध्ये प्रसिद्ध आहे. असाच एक डायलॉग हेराफेरी चित्रपटात परेश रावल हे अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसाठी वापरतात.

शिखर धवन भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाठी सज्ज झाला आहे. उद्या पासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मालिकेसाठी शिखरची निवड झाली आहे.

ही मालिका ३ सामन्यांची होणार आहे. सलामीवीर शिखरच्या कामगिरीकडे आता सगळ्यांचच लक्ष राहील कारण शिखर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला नव्हता. त्याच्या जागेवर अजिंक्य रहाणेला संधी मिळाली होती आणि रहाणेने ४ अर्धशतकांसह ५ सामन्यांच्या मालिकेत २४४ धावा केल्या होत्या.

या मालिकेतील पहिला सामना धोनीच्या घरच्या मैदानावर रांचीला खेळवला जणार आहे. भारतीय व ऑस्ट्रलिया संघ रांचीमध्ये दाखल झाला आहे.