शिवशक्ती क्रीडामंडळने पटकावले पुणेरी पलटण आंतर क्लब कबड्डी, नाशिक स्पर्धेचे विजेतेपद

नाशिक। सर्वांपर्यंत युवांचे टॅलेंट पोचावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणेरी पलटणतर्फे नाशिकच्या मीना ताई ठाकरे स्टेडियमयेथे बोल कबड्डी या आयपी अंतर्गत आंतर क्लब कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले. १६ संघांनी सहभाग घेत, चॅम्पियनशिपला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत शिवशक्ती क्रीडामंडळ विजेते ठरले आहे, ज्यांना ११,००० रुपये व करंडकाने गौरविण्यात आले. उपविजेता ब्रह्मा स्पोर्ट्स ठरले, ज्यांना ७,०००रुपये व एक चषक देण्यात आले. अंतिम सामन्यातील अंतिम स्कोर होता १९-१७.

क्रीडा प्रबोधनी तिसऱ्या आणि शिखरेवाडी क्रीडामंडळ चौथ्या क्रमांकाच्या विजेते ठरले आणि त्यांना प्रत्येकी रु.३,००० आणि एक करंडक देण्यात आले. तसेच सन्नी माटे (शिवशक्ती क्रीडामंडळ)हा उत्कृष्ट चढाईपटू ठरला व ओमकार कोकाळे (ब्रह्मा स्पोर्ट्स) हा उत्कृष्ट बचावपटू ठरला.

या निमित्ताने इनशुअरकोट स्पोर्टसचे सीईओ कैलाश कांडपाल म्हणाले की, “या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्रातील आपल्या चाहत्यांशी संपर्क साधायचा आहे आणि महाराष्ट्रातील प्रतिभावान कबड्डीपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे. या युवा खेळाडूंनी दाखविलेल्या उतस्फुर्तेने आणि कौशल्याने आम्हाला आनंद झाला. पुणेरी पलटण प्रती दाखविलेल्या प्रेम व समर्थनासाठी आम्ही नाशिकचे आभार मानतो.”

या स्पर्धेत सहभागी संघ आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी ह्या पुढाकाराचे खूप कौतुक केले. ह्या खेळाडूंनी अशा प्रकारच्या आणखी स्पर्धांमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक संख्येमध्ये दर्शक देखील उपस्तिथ होते. दर्शक त्यांच्या आवडीच्या संघांचे प्रोत्साहन करत होते आणि खेळाडूंचे मनोबल वाढवत होते. ही चॅम्पिअनशीप यशस्वी ठरली.

पुणेरी पलटणच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील प्रतिभा असलेले खेळाडू समोर येण्यास मदत होणार आहे. उत्साह आणि कष्टाने पुणेरी पलटणने आपला प्रवास सुरू केला आहे, विवो प्रो कबड्डी लीगच्या सातव्या पर्वात पुणेरी पलटणने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. टीम आपल्या शहरात – पुण्यात १४ सप्टेंबर २०१९ रोजी ते २० सप्टेंबर २०१९ रोजीपर्यंत मॅचेस खेळेल. श्री शिवछत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्स महालुंगे, बालेवाडी येथे या स्पर्धा होतील.