शिवशक्ती महिला संघ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार श्रमिक जिमखाना मैदानावर

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व शिवशक्ती महिला संघाच्यावतीने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ मे २०१९ ते २९ मे २०१९ या कालावधीत श्रमिक जिमखाना, ना.म.जोशी मार्ग, मुंबई येथे पार पडणार आहे.

“साहेब चषक कबड्डी स्पर्धा” हि शिवशक्ती महिला संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते. शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर मध्येच नव्हे तर राज्यातील एक नामवंत महिला कबड्डी संघ आहे. महाराष्ट्र शासनाचा खेळातील सर्वाच्च असणारा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त असलेले कबड्डी प्रशिक्षक श्री. राजेश पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत खूप आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडु घडले आहेत. शिवशक्ती महिला संघाकडून जिल्हास्तरीय पुरुष ‘अ’ गट, ‘ब’ गट, ‘क’ गटाचे आणि जिल्हास्तरीय व्यावसायिक महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यास्पर्धेत एकूण १११ पुरुष संघानी सहभाग घेतला आहे. तर व्यावसायिक महिला कबड्डी स्पर्धेत ९ संघानी सहभाग घेतला आहे. ९ दिवस चालणाऱ्या यास्पर्धेत एकूण १२० संघानी सहभाग घेतला असून स्पर्धेसाठी ३ मातीची मैदान तयार करण्यात आली आहेत.

या स्पर्धेत ‘अ ‘ गट स्थानिक पुरुष संघामध्ये मुंबई शहरामधील नावाजलेल्या संघापैकी बंड्या मारुती, विजय क्लब, शिवशक्ती, विजय बजरंग, अमरहिंद, गोल्फादेवी हे संघ तर व्यावसायीक महिला गटात देना बँक, बँक ऑफ बडोदा, महावितरण, सर जे.जे. हॉस्पिटल, साई सिक्युरिटी व इमराल्ड इन्फ्रा हे संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेकरिता जाहिर केलेली पारितोषिके:

१) स्थानिक पुरुष ‘अ’ गट :- कै. मा. श्री. बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक

२) स्थानिक पुरुष ‘ब’ गट :- माजी महापौर कै. मा. श्री. बाबुराव शेट्ये स्मृती चषक

३) स्थानिक पुरुष ‘क’ गट :- राष्ट्रीय खेळाडु कै. मा. श्री. मधुकर देवळकर स्मृती चषक

४) व्यावसायिक महिला गट :- कै. सुनिता सिताराम साळवी स्मृती चषक