म्हणून शोएब अख्तरला केलं जातंय ट्रोल !

कराची । पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर क्रिकेटमधील निवृत्तीनंतर एक वेगळंच जीवन जगत आहे. अगदी कोणत्याही गोष्टींवर तो आपल्या हलक्या फुलक्या कंमेंट्स देत असतो.

परंतु याचमुळे त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. सोशल माध्यमातून हा खेळाडू वेगवेगळ्या प्रकारे आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधतो.

ह्याच आठवड्यात शोएबला अशाच एका ट्रोल अभियानाला सामोरे जावे लागले. अँपल कंपनीने नवीन iPhone 8, iPhone 8 Plus आणि Phone X हे फोन बाजारात आणण्याची घोषणा केली. त्यावर अख्तरने एक खास ट्विट केला ज्यात अख्तर म्हणतो की माझ्याकडे सध्या iphone 7 आहे तो बदलून मी या तीनपैकी कोणता फोन घ्यावा?

त्याने चाहत्यांसाठी ट्विटर पोल तयार केला. त्याला तब्बल १० हजार लोकांनी उत्तर दिले. परंतु त्या ट्विटवर आलेले रिप्लाय मात्र नक्कीच शोएब अख्तरला समाधान देणारे नव्हते. ट्विपलने यावर शोएबचा चांगलाच समाचार घेतला.