Video: जेव्हा शोएब मलिक मैदानावरील या अपघातातून थोडक्यात वाचतो

न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्या दरम्यान पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकच्या चेंडू डोक्यावर आदळला. पाकिस्तान संघाची फलंदाजी चालू असताना ३२ व्या षटकादरम्यान हि घटना घडली.

मलिक चोरटी धाव घेत होता त्याचवेळी कॉलिन मुनरोने फेकलेला चेंडू त्याच्या डोक्याला लागला. मलिकने त्यावेळी हेल्मेट घातले नसल्याने त्याच्या डोक्यावर तो चेंडू जोरात आदळला.

चेंडू आदळल्यानंतर त्याला चक्कर आल्यासारखे झाल्याने लगेचच वैद्यकीय मदत मैदानावरच देण्यात आली. त्यानंतर लगेचच पुढच्याच षटकात मिशेल सॅन्टेनरने त्याला बाद केले.

या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवून वनडे मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे.

शोएब मालिकेला लागलेल्या चेंडूंबद्दल इएसपीएन क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान फिसिओथेरपीस्ट व्हीबी सिंग म्हणाले, “शोएबला मी आणि सामन्यासाठी असलेल्या डॉक्टरने तपासले आहे. त्याला कसलाही त्रास होत नाही आणि तो पुढे खेळू शकतो. पण तो बाद झाल्यानंतर त्याला पुन्हा तपासण्यात आले होते तेव्हा त्याला थोडे चक्कर आल्यासारखे वाटत होते. आता तो बरा आहे आणि अराम करत आहे. पण डॉक्टर आणि फिसिओथेरपीस्टच्या सल्यानुसार त्याने नंतर सामन्यात सहभाग घेतला नाही.”