HWL 2017: भारताची बेलजियमवर मात करत सेमीफायनलमध्ये धडक

भुवनेश्वर । येथे सुरु असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये भारताने बेलजियमचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

या स्पर्धेतील साखळी फेरीत भारतीय संघाला खास कामगिरी करता आलेली नव्हती. दोन पराभव आणि एक सामना बरोबरीत अशी भारताची कामगिरी राहिली होती. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

जागतिक क्रमवारीत बेल्जियम तिसऱ्या क्रमांकावर असून भारत सहाव्या क्रमांकावर आहे. हा सामना ओडिशामधील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर पार पडला.

सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी ३-३ एकमेकांना बरोबरीत रोखल्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्येही २-२ अशी बरोबरी झाली तेव्हा आकाश चिटकेने गोल करत करत संघाला ३-२ असा विजय भारताला मिळवून दिला.