रोहित शर्माच्या मुंबईसाठी अशी आहेत प्ले आॅफची समीकरणे!

मुंबई | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन आता साखळी फेरीचे केवळ ५ सामने बाकी राहिले आहेत. ६० सामन्यांपैकी ५६ सामने हे साखळी फेरीचे होणार आहेत.

२ संघ प्ले आॅफमध्ये गेले आहेत तर राहिलेल्या दोन जागांसाठी ५ संघ प्रयत्नशील आहेत. यात गतविजेत्या मुंबईसमोर प्ले आॅफमध्ये प्रवेश करण्यासाठी शेवटच्या सामन्यापर्यंत लढावे लागणार आहे.

मुंबईचे सध्या १३ सामन्यात १२ गुण झाले आहेत आणि त्यांचा शेवटचा सामना स्पर्धेतून बाहेर पडलेल्या दिल्ली डेअरडेविल्स संघासोबत होत आहे.

पंजाब संघावर विजय मिळवुन आयपीएल २०१८ मधील वाटचाल मुंबईने आपल्या हातात ठेवली आहे.

जर मुंबईने रविवारी शेवटच्या सामन्यात दिल्लीवर विजय मिळवला तर ते जवळपास प्ले-आॅफला पात्र ठरणार आहेत. याला त्यांचा सध्या सर्वाधिक चांगला असलेला नेट रनरेट (+०.३८४) कारणीभूत ठरणार आहे.

प्ले-आॅफला पात्र ठरण्यासाठी कोणत्याही संघाला कमीतकमी १४ गुण तसेच चांगला नेटरनरेट राखवा लागणार आहे. सद्यस्थितीत कोलकाता, मुंबई, राजस्थान आणि बेंगलोर हे संघ १४ गुणांपर्यंत मजल मारु शकतात. यात केवळ मुंबई आणि बेंगलोरचा नेट रनरेट हा पाॅझिटीव्ह आहे.

त्यात कोलकाता हैद्राबादविरूद्ध ते पराभूत झाले तर त्यांचे १४ गुण रहातील. पंजाबने जर चेन्नईला पराभूत केले तर त्यांचेही १४ गुण होतील तर राजस्थान आणि बेंगलोर यांच्यात जो संघ सामना जिंकेल त्याचे १४ गुण होतील.

बेंगलोरने हैद्राबादवर विजय मिळवुन एकप्रकारे १२ गुण मिळवणारी टीम आयपीएल प्ले आॅफला पात्र ठरु न शकण्याची काळजी घेतली आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात जर मुंबई दिल्ली विरुद्ध पराभूत झाली तर आयपीएलमधून बाहेर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गोलंदाजांसाठी ही आयपीएल या कारणामुळे ठरतेय खराब

तर कोलकाता जाणार आयपीएलमधून बाहेर

ख्रिस गेलच्या मनात धडकी, एबी डिव्हिलियर्स मोडतोय हा विक्रम

प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

एबी डिव्हिलियर्सला कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री करा!

विराट म्हणतोय, स्पायडरमॅनने घेतलेला हा कॅच पाहिला का?