श्रमिक जिमखान्यात आजपासून “पुरुष व महिला” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार!

शिवाई प्रतिष्ठानच्या विद्यमाने आज दि. १५नोव्हेंबर पासून पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होईल. मुंबई- ना म जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यावर दि. १८नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगेल.

या स्पर्धेत विजय क्लब, गुड मॉर्निग, बंड्या मारुती, अंकुर, विजय नवनाथ, गोलफादेवी, शिवशक्ती, जय भारत (सर्व मुंबई शहर), जॉली, उत्कर्ष (उपनगर), शाहू सडोली, नवभारत (कोल्हापूर), सतेज (बाणेर-पुणे), ओम कबड्डी, शिवशंकर (ठाणे), श्रीराम (पालघर) आदी नामवंत संघ पुरुषांत, तर शिवशक्ती, अमरहिंद, डॉ.शिरोडकर, मुंबई पोलीस (मुंबई शहर), महात्मा गांधी, संघर्ष (उपनगर), छत्रपती, होतकरू (ठाणे), राजमाता जिजाऊ, सुवर्ण युग (पुणे), शिवाजी उदय (सातारा), अनिकेत (रत्नागिरी) आदी नामवंत संघ महिलात सहभागी होणार आहेत.

या सहभागी संघाची चार गटात विभागणी करण्यात येऊन सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील.

या करिता तीन क्रीडांगणे तयार करण्यात आली असून सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. पुरुषांत विजयी होणाऱ्या संघास चषक व रोख रु.पन्नास हजार (₹ ५०,०००/-) ,तर उपविजयी संघास रोख रु. तीस हजार (₹ ३०,०००/-) प्रदान करण्यात येतील.

उपांत्य दोन्ही संघांना देखील प्रत्येकी चषक व रोख रु. दहा हजार (₹ १०,०००/-) देण्यात येतील. महिलांत विजेत्या संघाला चषक व रोख रु. तीस हजार (₹ ३०,०००/-), तर उपविजयी संघास रोख रु. पंधरा हजार (₹ १५,०००/-) प्रदान करण्यात येतील.

उपांत्य दोन्ही संघांना देखील प्रत्येकी चषक व रोख रु सात हजार (₹ ७,०००/-) पारितोषिका दाखल देण्यात येतील. शिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आदी खेळाडूंना देखील आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. दि. १५नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५-३०वा. या स्पर्धेला सुरुवात होईल.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

रुट- कोहलीबरोबर घडला क्रिकेटमधील सर्वात वेगळा योगायोग

१६१ कसोटीत कूकला जे जमले नाही ते सॅम करनने ७ कसोटीत करुन दाखवले

टीम इंडियाला नडलेल्या सॅम करनचा श्रीलंकेला तडाखा

डिव्हिलियर्स वादळाचा तडाखा, केले शानदार पुनरागमन

बालदिनाचे औचित्य साधून केकेआरने केले हे खास सेलिब्रेशन, पहा फोटो...